कंधार ;प्रतिनिधी
कंधार पंचायत समिती मधुन ऐका घरकुल लाभार्थ्यांनचा फोन आला म्हणून माजी सैनिक संघटना तुरंत पंचायत समिती मधे पोहचली.व बिडीओ कैलास बळवंत यांना याचा जाब विचारत घरकुल लाभार्थांना त्रास होणार नाही तसेत तुरंत घरकुलाचे प्रश्न निकाली लावण्यासाठी माजी सैनिक संघटना जिल्हा अध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी धारेवर धरले.
संघटनेने या आगोदर पण बिडीवो ला सुचना दिल्या होत्या तरी पण यांनी काही प्रमाणात काम सुरुळीत करत नव्हते म्हणुन आज चांगलाच समाचार घेतला असल्याची माहीती बालाजीचुकलवाड यांनी दिली.तसेच लोहा तहसील येथे घडलेली घटना कंधार मधे घडु नये यासाठी बिडीवो ला सक्त इशारा माजी सैनिक संघटनेच्या वतीने देण्यात आला.यावेळी माजी सैनिकासह घरकुल लाभार्थी उपस्थित होते.