कंधार ; प्रतिनिधी
भारताच्या ऐक्य आणि अखंडतेसाठी आपले प्राण अर्पण करणारे थोर शिक्षणतज्ज्ञ, जनसंघाचे संस्थापक, डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंती निमित्त लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी कंधार येथील संपर्क कार्यालयात अभिवादन केले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष भगवान राठोड, शिक्षक आघाडी तालुकाध्यक्ष राजहंस शहापूरे,उपनगराध्यक्ष जफर बाओद्दीन,सरचिटणीस किशन डफडे सर,उपाध्यक्ष चेतन केंद्रे,नगरसेवक बालाजी पवार,आसेफ शेख,सुनील कांबळे,बालाजी पाटील तोरणे,आत्माराम परांडे,रजत शहापुरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.