हरित कंधार टीमचे कार्य कौतुकास्पद – प्रा.पुरुषोत्तम धोंडगे

कंधार (प्रतिनिधी)
हरित कंधार परिवाराच्या वतीने दिनांक १ जुलै कृषिदिनानिमित्य तालुक्यात ५ हजार फळझाड वृक्षाची लागवड उपक्रम राबवला असून फळझाडाची लागवड करण्यासाठी शहरासह तालुक्यातील प्रत्येक कुटुंबास प्रत्येकी दोन फळझाडे आणि शेंद्रीय खत दिला आहे. या तीनदिवस वाटपाचा समारोप झाला. या उपक्रमाची नोंद श्री.शिवाजी मोफत एज्युकेशनचे अध्यक्ष प्रा.पुरुषोत्तम धोंडगे यांनी हरित कंधार परिवारातील सर्व सदस्यांचे उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार करून हरित कंधार परिवारासोबत स्नेह भोजनाचा स्वाद घेतला.


तालुक्यात “हरित कंधार परिवार” या टीमने दि.२१/०६/२१ ते २६/०६/२१ दरम्यान मोफत फळझाड वाटप या उपक्रमास नाव नोंदणी करून घेतली व दि १ जुलै २०२१ ते ३ जुलै २०२१ या तीन दिवसात टीमने मोफत ५ हजार फळझाडे व शेंद्रीय खत वाटप केले. फळझाड वाटप कै.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त व कृषी दिनाचे औचित्य साधून फळझाड वाटप करण्यात आले.

हरित कंधार परिवाराने फळझाड वाटप केलेले कार्य कौतुकास्पद असून पर्यावरनाचा समतोल राखण्यासाठी तालुक्यात मोठं कार्य केल्याबद्दल प्रा.धोंडगे यांनी छत्रपती संभाजी राजे इंग्लिश स्कुल या ठिकाणी हरित कंधार परिवाराचा सन्मान करण्यात आला.या प्रसंगी प्रा.पुरुषोत्तम धोंडगे म्हणाले कि, कंधार तालूक्यात जशी हिरवळ अली तशीच हिरवळ लोहा नगरीतही सुरु करावा,याकामी मी आपल्या सोबत असणार असून लागेल ती मदत करण्यास तयार आहे. हरित कंधार परिवाराचे प्रमुख शिवाभाऊ मामडे यांचा सत्कार करतांना तुमचे कार्य दहा वर्षानंतर मन्याड खोर्‍यात सर्वत्र दिसेल यात शंकाच नाही असे हि ते म्हणाले.
या गौरव कार्यक्रमाच्या वेळी हरित कंधार परिवारातील सर्व सदस्य,श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष माधवराव पेठकर,सदस्य गुरुनाथ पेठकर,प्रा.सतीश धोंडगे यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *