कंधार, (प्रतिनिधी)-
कंधार तालुक्यातील आंनदवाडी येथील मन्याड नदीवर बंधारा निर्मितीसाठी निधी देण्यात यावा, अशी मागणी जलसंपदा मंत्री ना. जयवंत पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे कंधार ता. उपाध्यक्ष गोपीनाथ केंद्रे यांनी निवेदन दिले आहे.
मन्याड नदीवर बंधार नसल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.
हा बंधारा निर्माण झाल्यास आनंदवाडी, उम्रज, बोरी, जाभुळवाडी, सोनमाळ तांडा येथील शेती व्यवसायास मदत होऊन त्यांची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकते,
ह्या बंधाराऱ्यासाठी तत्कालीन आमदार शंकर अण्णा धोंडगे यांच्याकडे मागणी केली होती. बंधाऱ्याची प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे वृत्त आहे. पण त्या बंधाराऱ्यांच्या कामाला कामाला सुरवात झाली नाही. त्यामुळे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या बंधाऱ्याच्या कामातलक्ष घालुन या कामासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, अशा मागणीचे निवेदन गोपीनाथ केंद्रे उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस कंधार यांनी जयंत पाटील यांना नांदेड दौरा प्रसंगी दिले.