विद्यार्थ्यांना टाईपरायटींचे प्रशिक्षण देणारे गुरुवर्य काप्रतवार

कंधार ; प्रतिनिधी

कंधार शहरात जवळपास 40-45 वर्षा पासून टाईपरायटींचे प्रशिक्षण देणारे टंकलेखनाचे दत्तात्रय म्हणुन त्यांनी गोरगरिबांच्या लेकरासहित अनेक विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करुन अनेक लिपिकांना त्यांनी टाईपरायटींमध्ये निपुण केले.

परळी येथील एका ज्ञानालयात ते लिपिक म्हणून नोकरीस लागले खरे पण नियतिच्या मनात वेगळेच होते. त्यांनी स्वतः लिपिकांचे स्वप्न अधुरे झाले तरी त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना टंकलेखनाची कलादान करुन अनेकांना जीवन जगण्याचा हुद्दा मिळवून देण्यासाठी खारीचा वाटा उचलला.

त्यांचा जन्म ७ जुलै 1953 म्हणजे स्वातंत्र्यानंतर गोविंदराव काप्रतवार यांच्या उदरी झाला.त्यांचा विवाह सुमंगलाताई यांचेशी झाला.त्यांच्या अनेक गुण आहेत त्यापैकी पर्यटन, मनमिळाऊ स्वभाव, मितभाषी, अजातशत्रू, प्रामाणिकता, गोरगरिबांच्या लेकरांना आधार देणारे.
त्यांचे बालमित्र म्हणजे मनोविकास विद्यालयाचे सेवानिवृत्त पर्यवेक्षक बनसोडे सर आहेत. पहिल्यांदा त्यांनी टाईपरायटींचे इन्स्टिट्यूट घेतले.ते औरादकर वकील साहेबांच्या दुकानात. त्यानंतर ऐतिहासिक कंधाच्या शिवाजी चौकात अन् सध्या कै.शंकररावजी पा. जाधव वाखरडकर या काॅप्लेक्समध्ये टंकलेखन इतिहासात जमा झाले.

आता मात्र बदलत्या युगानुसार
संगणकावर टाईपरायटींचे प्रशिक्षण देत आहेत.अशा अजातशत्रू,अवलिया आदरणीय दत्तात्रय गुरुवर्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतांना आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन करुन कांही आठवणी शब्दबध्द करण्याचा मोह आवरता आला नाही.हे लिहितांना,डाॅ. वैद्यराज जायभाये सर, गुरुवर्य बनसोडे सर अन् गुरुवर्य चिद्रावार सरांची मदत झाली.आज माझी शाळा श्री शिवाजी हायस्कूल हु.माणिकराव काळे रोड कंधार या शाळेजवळ जबडे यांच्या निवासस्थाना समोर आदर्श टंकलेखन शिक्षक यांना श्री शिवाजी काॅलेज कंधारचे क्रिडा विभाग प्रमुख व दैनिक लोकमतचे आदर्श लेखनी बहाद्दर पत्रकार, आमचे मार्गदर्शक गुरुवर्य डाॅ. प्रा.गंगाधरराव तोगरे सर यांच्या समर्थ हस्ते पुष्पहार घालून वाढदिवसानिमित्त दीर्घायुरारोग्य अभिष्टचिंतन करण्यात आले.

या प्रसंगी मनोविकास विद्यालय कंधार या ज्ञानालयाचे आदर्श उपमुख्याध्यापक बंडेवार सर,श्री शिवाजी विद्यालय बारुळचे आदर्श शिक्षक,उत्कृष्ट पेन्सिल स्केच कलावंत प्रदीप सूर्यवंशी सर उपस्थित होते आदरणीय गुरुवर्य दत्तात्रयजी काप्रतवार सरांना सुमंगलाहर्षित खंडोगणती मनापासून सदिच्छा!

दत्तात्रय एमेकर, सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *