लोहा तालुक्यातील उमरा येथिल भिमराव चंपत सिरसाठ यांच्या परीवाराचे माजी सैनिकांनी केले सांत्वन

लोहा.प्रतिनिधी

उमरा ता.लोहा येथील भिमराव चंपत सिरसाठ यांनी तहसील प्रशासनाच्या हलगर्जी निषकाळजी निर्लज्ज आणि भ्रष्ट कारभारांन समोर हार मानुन आत्महत्या केली.आज दि.७ जुलै रोजी माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या परिवाराची भेट घेऊन सांत्वन केलं आणि हा प्रकार कसा काय घडला याला जबाबदार कोण याची सविस्तर चर्चा करण्यात आली.

माजी सैनिक संघटना या प्रकरणाला खपुन घेणार नाही आणि जे कोणी यात दोषी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहीजे यासाठी माजी सैनिकांची भुमीका ठाम असणार अशी माहीती माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *