कंधार ; प्रतिनिधी
तहसिल कार्यालय कंधार येथे आज गुरुवार दि.८ जुलै रोजी कार्यालयीन वेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.जवळपास सर्वच कर्मचाऱ्यांनी या शिबीराचा लाभ घेतल्याची माहीती नायब तहसिलदार विजय चव्हाण यांनी दिली.
स्पार्क लाईफ केअर मुंबई यांच्या तर्फे दि.८ जुलै रोजी तहसिल ,एस.डी.ओ.कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे मोफतशाआरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात इले होते.
या आरोग्य तपासणी शिबीरात नाडी परीक्षण ,प्रकृती परीक्षण,आहार सल्ला ,नेत्र चिकीत्सा ,ब्लड प्रशेर,इ.सी.जी.बॉडी फँट तसेच मशिनद्वारे संपुर्ण तपासणी ,रक्त तपासणी करण्यात आली.शिबीरासाठी डॉ.सुनिल बर्गे,डॉ.अनिल अग्रवाल,कल्पेस सोळे,वैशाली गवाले,दीपक लोखंडे,दीपक इंगोले,राजाराम जानकर आदीनी कर्मचाऱ्यांची तपासणी केली.
जवळपास सर्वच कर्मचाऱ्यांनी या तपासणी शिबीराचा लाभ घेतला असल्याची माहीती नायब तहसिलदार विजय चव्हाण यांनी दिली.सुर्यकांत ताडेवार,अजय गाजरे,मन्माथ थोटे,बारकुजी मोरे,यांच्या सह महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष मिर्झा जमीर बेग,पत्रकार महंमद सिंकदर आदीनी या शिबीराचा लाभ घेतला आहे.