कंधार ; प्रतिनिधी
कंधार नगर परिषदेच्या नवीन कॉम्प्लेक्सला प्रसिद्ध दर्गा हजरत हाजी सय्याह सरवरे मगदूम रहमतुल्ला ही (बडी दर्गा )यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी आज गुरुवार दि.८ जुलै रोजी कंधार नगर परिषद कार्यालय कंधार यांना तन्जीम ए इन्साफ संघटनेच्या वतीने करण्यात आली.
कंधार येथील बडी दर्गा येथे महाराष्ट्र ,तेलंगणा ,सीमा आंध्र,कर्नाटक ,मध्यप्रदेश, आदी राज्यातून सर्व धर्माचे लोक येथे दर्शनासाठी येतात व त्यांची इच्छा येथे पूर्ण होते बडी दर्गा प्रसिद्ध असून या कंधार नगर परिषदेच्या कॉम्प्लेक्सला बडी दर्गाचे नाव देऊन सर्व जातींना न्याय देण्याचे काम करावे असे निवेदनात केली आहे.
सदरील निवेदन एकनाथ शिंदे नगर विकास ,सार्वजनिक बांधकाममंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई , जिल्हाधिकारी नांदेड , तहसीलदार तहसील कार्यालय कंधार ,नगराध्यक्षा सौ, शोभाताई अरविंद नळगे नगरपरिषद कार्यालय कंधार, येथे निवेदनाद्वारे मागणी तन्जीम ए इन्साफ च्या वतीने करण्यात आले.
यावेळी तन्जीम ए इन्साफ कंधार तालुका अध्यक्ष शेख शादुल भाई.अँड शहबाज खान( अध्यक्ष दर्गा कमिटी कंधार), शेख सादात तालुका सचिव कंधार ,नाजेर उस्मान शेख,मेहबूब शेख, रब्बानी,आरशद कुरेशी यांनी मागणी केली आहे.