बहादरपुरा ; प्रतिनिधी
तालूक्यात चळवळीची क्रांति नगरी बहाद्दरपुरा ता.कंधार ही प्रसिद्ध आहे.जि.प.के.प्रा.शाळा बहाद्दरपुरा ही शाळा एक आदर्श म्हणून गणल्या जाते.या शाळेनी खासदार, आमदार, जिल्हाधिकारी,उच्चपदस्थ अधिकारी,पं.स.सदस्य, जि.प.सदस्य, डाॅक्टर, प्राध्यापक, शिक्षक, अनेक सामाजिक कार्यकर्ते निर्माण करुन समाजात आदर्श शाळा म्हणून गणल्या जाते.येथे मावळते मुख्याध्यापक धोंडीबा गुंटूरे सेवानिवृत्त झाल्यानंतर या शाळेत विद्यार्थीप्रिय आदर्श शिक्षक, सुनिल गवळे यांना रिक्त झालेल्या मुख्याध्यापक पदी निवड करताच विद्यार्थी व पालक वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.त्या निवडीबद्दल अनेकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.
सुनिल गवळे यांनी या पुर्वी ज्ञानदानाचे कार्य किनवट विभागात आदिवासी पाड्यात करुन कंधार तालूक्यात चिंचोली-(पं.कं)येथे सेवा बजावून बहाद्दरपुरा येथील प्राथमिक शाळेत बदली झाली.अल्पावधीतच त्यांनी विद्यार्थीप्रिय होण्याचा बहुमान प्राप्त करून पालकांची मने जिंकून घेतली.पार-पाच-सहा वर्ष सेवा केल्या नंतर आज ते मुख्याध्यापक पदाच्या खुर्चीत विराजमान झाले.ते दिव्यांग असलेतरी ज्ञानदानात बहुआयामी व्यक्तीमत्वाने चमकतात.त्यांचा गोड सुमधुर आवाज असल्यामुळेच विद्यार्थ्यांना बालगीतातून ज्ञानलालसा व सृजनशीलता वृध्दींगत करण्यासाठी धडपडतात.त्यांचे उत्कृष्ट फलक लेखन असल्यामुळेच दैनंदिन सुविचार व महापुरुषाच्या जयंती व मयंती दिनी अभिवादनाचे फलक लेखन करुन शाळेचे वातावरण प्रसन्न ठेवून विद्यार्थीना संस्काराचे मोती दैनंदिन देत असतात.
त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर माझी उर्वरीत सेवा आत्तापर्यंतच्या धडपडी सारखी ठेवून विद्यार्थीदैवतेची ज्ञानदानाने पुजा-अर्चना नित्यानेच करणारच असा ठाम विश्वास व्यक्त करत पदभार स्वीकारला.मुख्याध्यापक आदरणीय सुनिलजी गवळे सरांना येत्या भविष्यातील शैक्षणिक कार्यकतृत्वाला मनसोक्त अभिनंदन करुन शतकोटी .
गोपाळसुत-दत्तात्रय एमेकर, सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार