कंधार ; प्रतिनिधी
कंधार-लोहा रोडवरील मागासवर्गीय व अल्पसंख्याक आसाननगर वस्तीमध्ये, १३२ के. व्ही. पॉवर हाऊसच्या समोरील भागात पिण्याच्या पाण्याची व रोडची सोय नाही तसेच हा भाग ग्रामपंचायत मध्ये आहे त्यामुळे भौतिक सुविधा मिळत नसल्याने आसाननगर न. पा. मध्ये समाविष्ठ करुन घेऊन मुलभुत सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी दि.८ जुलै रोजी नगराध्यक्षा सौ.शोभाताई नळगे यांना निवेदनाद्वारे केली आहे.
आसाननगर, १३२ के. व्ही. पॉवर हाऊसच्या समोरील भागात १४ ते १५ वर्षापासून वस्ती आहे. येथिल नागरीकांना अद्यापपर्यंत पाण्याची सोय नाही व रोड, नाली सुध्दा नाही.यापुर्वी आमदार व न. पा. कंधार यांच्याकडे लेखी अर्जाद्वारे विनंती केली होती परंतु त्यावेळी या भागात फक्त पाईप लाईन टाकण्याचे काम झाले. परंतु त्या पाईप लाईनला नळ कनेक्शन जोडण्यात आले नाही. त्यामुळे पाणी आजपर्यंत मिळाले नाही.
तात्काळ पालीका प्रशासनाने नळ कनेक्शन जोडुन देवुन पिण्याच्या पाण्याची सोय करुन द्यावी. आसान नगर व परीसर हे रिव्हीजन करुन कंधार लोहा रोडवरील मागासवर्गीय व अल्पसंख्याक – आसाननगर या वाढीव वस्तीमध्ये १३२ के. व्ही. पॉवर हाऊसच्या समोरील भागात पिण्याच्या पाण्याची व रोडची सोय करणे बाबत व हा भाग न. पा. मध्ये समाविष्ठ करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या निवेदनावर शेख सद्दाम कंधारी,मोहम्मद अजीम, मोहम्मद बबर साहब ,
मोमीन तौसीफ,शैख अफसर,
हाबू भाई,मगदूम सर आदीच्या स्वाक्षरी आहेत.