पीआरपीच्या युवा जिल्हाध्यक्षपदी साहेबराव सोनकांबळे यांची निवड

नांदेड/प्रतिनिधी


नांदेड शहरातील फुले ,शाहू आंबेडकरी चळवळीचे तरुण तडफदार युवा नेतृत्व म्हणून परिचित असलेले युवा सामाजिक कार्यकर्ते साहेबराव सोनकांबळे यांची
पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या नांदेड जिल्हा युवक आघाडीच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.

पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष लाँग मार्च प्रणेते प्रा. जोगेद्र कवाडे यांच्या आदेशावरून राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, प्रदेशाध्यक्ष चरणदास इंगोले, प्रदेश उपाध्यक्ष तथा नगरसेवक बापूराव गजभारे यांच्या नेतृत्वात साहेबराव सोनकांबळे यांची पीपल्स रिपब्लिकन पार्टी नांदेड युवा जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे कुशल संघटक व समाजकार्यात सदैव झोकून दिलेले साहेबराव सोनकांबळे यांच्यावर युवा जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्याने सोनकांबळे हे पक्ष संघटन व पक्ष वाढीसाठी नक्कीच प्रयत्न करतील असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी केला असून
प्रदेश उपाध्यक्ष बापूराव गजभारे, जिल्हा विनोद भरणे, उपाध्यक्ष संघरत्न कंधारे, सतिश पांडवे यांच्या उपस्थितीमध्ये सोनकांबळे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *