कंधार ; प्रतिनिधी
श्री संत निवृत्ती महाराज विद्यालय कंधार शाळेतील शिक्षक शंकर पाटील गिरे हे आज शनिवार दि.१० जुन रोजी शाळा करुन आपल्या खाजगी वाहन कारने नांदेड कडे जात असताना उस्माननगर नांदेड महामार्गावर आपघात होवून ते जागीच ठार झाले.
शंकर दशरथ पाटील गिरे हे सहशिक्षक म्हणून श्री संत निवृत्ती महाराज विद्यालय भवानीनगर कंधार येथे कार्यरत होते.आज रोजी नांदेड उस्माननगर रोडवर जोशीसांगवी येथे अचानक त्यांची कार क्रमांक mh 24/v2278 या कारने नांदेड जात असताना गाडीचा ताबा सुटला आणि अपघात होऊन शंकर दशरथ पाटील गिरे जागीच ठार झाले.ते माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव पाटील गिरे यांचे ते चुलत भाऊ होते.या घटनेची नोंद सोनखेड पुलीसात नोंद करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक मांजरमकर,पोलीस उपनिरीक्षक कारामुंगे हे अधिक तपास करत आहेत. नांदेड विष्णूपुरी येथिल शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले,व रात्री १० वाजता कंधार तालुक्यातील त्यांच्या मुळगावी गऊळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात दोन मुले पत्नी असा परीवार आहे.