प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनाक १२ जुलै २०२१ रोजी दुपारी ०१:०० वाजता दिलेल्या सूचनेनुसार दिनांक १२ जुलै २०२१ ते १६ जुलै २०२१ या काळात नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार से अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून खालील प्रमाणे काळजी घ्यावी.
वादळ, मेघ गर्जना आणि आकाशात विजा चमकत असताना काय करावे आणि काय करू नये
या गोष्टी करा
१) विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा.
२) आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या घराच्या बाल्कनी छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका.
३) आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरण चालू असतील तर त्यातूरकरा ४) तारांचे कुंपण विजेचे खाब व इतर लोखडी वस्तूपासून दूर रहा
५) पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.
या गोष्टी करू नका
१) आकाशात विजा चमकत असल्यास धरातील लेडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका,
२) विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.
३) उच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका.
४) धातूच्या उथ मनोन्याजवळ उभे टाकू नका.
५) जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका, हे बाहेर बाबण्याइतकेच धोकादायक आहे.
(प्रदीप कुलकर्णी)
निवासी उपजिल्हाधिकारी, नांदेड