कंधार ; प्रतिनिधी
कंधार तालुक्यातील फुलवळ जिल्हा परिषद सर्कल मध्ये दिनांक 11 जुलै 2021 रोजी सायंकाळी मोठ्या प्रमाणात पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसानझाले आहे.त्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करुन शेतकऱ्यांना मदत द्या अशी मागणी कंधार तहसील कार्यालय तहसीलदार यांच्याकडे तन्जीम ए इन्साफचे तालुका अध्यक्ष शेख शादुल यांनी आज दि.१२ जुलै रोजी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
कंधार तालुक्यातील फुलवळ मार्ग जांब -उदगीर जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील अर्धवट फुलांच्या कामामुळे गुत्तेदारांच्या व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे अर्धवट पुलाच्या कामामुळे आजू -बाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पुराचे पाणी गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .
परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे परिसरातील फुलवळ, मुंडेवाडी ,टोकवाडी ,कंधारेवाडी!पानशेवडी,गऊळ, अंबुलगा,हरबळ सह इतर गावामध्ये शेतकऱ्यांच्या कापूस ,ज्वारी ,तूर ,मूग ,सोयाबीन,हळद,आदी पिकांचे व इतर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासनाने तात्काळ सरसगट पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी.
शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अन्यथा तन्जीम ए इन्साफ च्या संघटनेच्या मार्फत आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे केला आहे.
निवेदनावर शेख शादुल तालुका अध्यक्ष ,शेतकरी बांधव अंकुश खुशाल राव मंगनाळे ,दिगंबर माधव मंगनाळे ,कल्याण बाई शेषराव मंगनाळे,गणेश नागोराव मंगनाळे,नागेश बाबुराव मंगनाळे,महादेव धोंडीबा मंगनाळे ,मुक्तेश्वर पंढरी मंगनाळे,शिवाजी हनुमंतराव मंगनाळे ,बाबुराव हनुमंतराव मंगनाळे,बालाजी रामजी, शंकरा मंगनाळे,शेख खाजा मिया ,राठोड राजु रामचंद्र ,शिवाजी शेंबाळे, आनंदा पवार,अख्तर पिंजारी सह 50 शेतकऱ्यांच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत.