लोंढे सांगवी येथे आशाताई शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी संवाद मेळावा संपन्न

लोहा (प्रतिनिधी)
लोहा तालुक्यातील लोंढे सांगवी फाटा येथे राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत व लोहा -कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे यांच्या प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्त्या सौ .आशाताई शामसुंदर शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी संवाद मेळावा उत्साहात संपन्न झाला.

यावेळी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधताना सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई शिंदे म्हणाल्या की शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार शामसुंदर शिंदे साहेब सदैव कटिबद्ध असून लोहा-कंधार मतदार संघातील शेती व शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी आम्ही कायम प्रयत्न करणार असून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आमचा कृती आराखडा तयार असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांनी शेतकरी बांधवांशी बोलताना स्पष्ट केले, यावेळी शेतकरी नेते गुणवंत पाटील हंगरगेकर प्रमुख उपस्थित होते या कार्यक्रमास आनंद देशमुख लोंढे सांगवी कर, आनंद लोंढे , पांडुरंग पाटील शिंदे, गोविंदराव लोंढे, बाळू आनंतवाड, आनंद लोंढे, विश्वनाथ लोंढे सह परिसरातील शेतकरी बांधव व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *