कंधार ; प्रतिनिधी
तहसिल कार्यालय कंधार येथे
तलाठी ,मंडळ अधिकारी व कृषी सहायक, पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी यांची बैठक शुक्रवार दि.१६ जुलै रोजी सायंकाळी संपन्न झाली.
नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्याचे महसूल व कृषि संयुक्त पंचनामे व तपासणी करणे , कोरोना संसर्गामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना सामाजिक अर्थ सहाय्य योजना अंतर्गत लाभ देण्यासाठी भेटी देऊन प्रस्ताव सादर करणे, अन्नधान्य वितरण वर तलाठी संनियंत्रण ठेवणे व निवडणूक बाबीचा आढावा व मार्गदर्शन करण्यात आले
या बैठकीत तालुका कृषी अधिकारी देशमुख साहेब व तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी मार्गदर्शन केले.
बैठकीस नायब तहसीलदार ताडेवाड , कुलकर्णी मॅडम, मंडळ कृषी ,अधिकारी विकास नारनाळीकर, नैसर्गिक आपत्तीचे राम पांचाळ, संजय गांधी चे बारकुजी मोरे ,पेशकार पानपट्टे , निवडणूक विभागाचे मन्मथ थोटे, आदी उपस्थित होते.