कंधार :- हनमंत मुसळे
तालुक्यातील पेठवडज सर्कल,फुलवळ सर्कल व इतर ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकाचे अंतोनात नुकसान झाले असुन नुकसानीचे पंचनामे करुन नुकसान भरपाई तात्काळ वाटप करावी अश्या मागणीचे निवेदन मा. तहसिलदार, कंधार यांना सौ. लता पंजाबराव वडजे (उपसभापती पं. स. कंधार) व पंजाबराव पा. वडजे ( सरपंच संघटणा तालुका अध्यक्ष कंधार ) यांनी दिले आहे.
कंधार तालुक्यातील पेठवडज सर्कल, फुलवळ सर्कल व इतर विविध भागात मुसळधार पाऊस व ढगफुटी झाल्यामुळे पुर येवुन शेतीतील कापुस, तुर, मुग, उडीद, ज्वारी, सोयाबीन व इतर पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे . शेतकरी वर्ग एकदाच पेरणी करुन मेटाकुटीला आला असुन आता दुस-यादा पेरणी करण्याची वेळ शेतक-यावर आली आहे. तर काही शेतक-याचे शेत पुराने खचुन व वाहुन गेले असुन कष्टकरी, शेतकरी, शेतमजुर याच्या घराची सुध्दा पडझड झाली आहे. पेठवडज सर्कल मध्ये झालेल्या अतिवृष्टीची नोंद घेणेसाठी यंञ नसल्यामुळे झालेल्या पावसाची नोंद घेता येत नसल्यामुळे पेठवडज सर्कल मध्ये पाऊसाची नोंद घेणेसाठी पाऊस नोंद यंञ बसवण्यात यावे तसेच कंधार तालुक्यामध्ये नुकसान झालेल्या गावाचे पंचनामे करण्याचे काम अद्यापही चालु झालेले नाहीत. तात्काळ पंचनामे करुन शेतक-याना नुकसान भरपाई देण्यात यावी अश्या मागणीचे निवेदन मा. तहसिलदार, कंधार यांना सौ. लता पंजाबराव वडजे (उपसभापती पं.स.कंधार) व पंजाबराव पा. वडजे ( सरपंच संघटणा तालुका अध्यक्ष कंधार) यांनी दिले आहे. या निवेदनावर सौ. सत्यभामा देविदास गायकवाड (सरपंच मादाळी), सौ. भाग्यश्री भुंजग देव्हारे (सरपंच नारनाळी), सौ. बेबाबाई दत्ता मोरे (सरपंच खंडगाव), अशोक गायकवाड , भुंजग देव्हारे, व्यंकट गायकवाड , निवृत्ती वडजे आदिच्या स्वाक्ष-या आहेत.