बिलोलीत काँग्रेसकडुन इंधन दरवाढ व महागाईच्या विरोधात शवयाञा


*नगराध्यक्षा कुलकर्णीसह अन्य महिलांनी रस्त्यावरच चुली पेटवुन मोदी सरकारचा केला निषेध

बिलोली ; प्रतिनिधी

पेट्रोल,डिझेल व घरगुती गॕस सिलेंडरच्या दरवाढीने नागरिक ञस्त झाले आहेत.त्याचप्रमाणे महागाई गगनाला भिडत चालली आहे.या सर्व प्रकाराला केंद्रातील मोदी सरकारचे जनविरोधी धोरणच कारणीभूत आहे,असा आरोप करीत तालुका काँग्रेस,युवक काँग्रेसच्यावतीने गाढव,घोडे,बैलगाडी,सायकलसह महागाईची प्रतिकृती तयार करुन शवयाञा काढुन मोदी सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.एवढेच नव्हेतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासुन ते गांधीचौकातुन तहसिल कार्यालयासमोर तिरडीच मांडली तर नगराध्यक्षा सौ.मैथिली कुलकर्णी,तालुकाध्यक्षा मधुमती सुंकलोड,नगरसेविका महानंदा देशमुख,ज्योती जेठे,अनुजा शंकपाळे,राधाबाई पटाईत,सविता कांबळे आदींनी चक्क रस्त्यावर चुली मांडुन मोदी सरकारचा निषेध नोंदविला आहे.


सतत वाढत असलेल्या पेट्रोल,डिझेल आणि गॕस सिलिंडर दरवाढीमुळे सर्व सामान्यांचे जीवन जगणे कठीण झाले आहे.त्यातच खाद्यपदार्थासह इतर जीवनपयोगी साहित्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.या वाढत्या महागाईला केंद्र सरकारचा जनविरोधी धोरणच कारणीभूत आहे.असा आरोप काँग्रेसच्यावतीने करण्यात आला.मोदी सरकारच्या जनविरोधी धोरणाविरुध्द आ.अमरनाथ राजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका काँग्रेसकमिटी,युवक काँग्रेसच्यावतीने तालुकाध्यक्ष प्रा.शिवाजी पाटील पाचपिंपळीकर,माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी,माजी नगराध्यक्ष भिमराव जेठे,मारोती पटाईत,उत्तम जेठे,अमजद चाऊस,वलिओद्दीन फारुखी,नितीन देशमुख,हानमल्लु यंबडवार,मुन्ना पोवाडे,गटनेते नागनाथ तुम्मोड,नगरसेवक जावेद कुरेशी,शाहेद बेग इनामदार,प्रकाश पोवाडे,अरुण उप्पलवार,संदीप कटारे आदींच्या प्रमुख नेतृत्वात शहरात महागाईच्या प्रतिकृती शवयाञा काढण्यात आली.

दरम्यान शवयाञेचे समाधान तहसिल कार्यालयासमोर करण्यात आले.यावेळी तिरडीसमोर अनेक युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकारचा निषेध नोंदविला.सदर आंदोलनाने शहरवासींयांचे लक्ष वेधले होते.या आंदोलनात आ.अमरनाथ राजुरकर,तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील,मारोती पटाईत,वलिओद्दीन फारुखी,संतोष कुलकर्णी,दिलीप पांढरे आदींनी इंधन दरवाढविरोधात निषेध व्यक्त केला,यावेळी युवक काँग्रेसचे जितेश अंतापुरकर,मंगेश कदम,पप्पु पाटील कोंडेकर,कुंडलवाडी उपनराध्यक्ष शैलेश -याकावार,नरेश जिट्टावार,उपसभापती शंकर यंकम ,प्रभाकर पेंटे,संतोष पा.खतगांवकर,झिशान देशाई,जानीभाई सावळीकर,अल्पसंख्याकचे फेरोज खान,गिरीधर पा.डाकोरे,धोंडीबा कपाळे,पांडुरंग रामपुरे,गंगाधर भिंगे,अॕड.शंकरराव कुरे,युवक काँग्रेसचे अविनाश पत्के,श्रिनिवास पाटील,गोविंद मुदगुरे यांच्यासह तालुक्यातील असंख्य महिला-पुरुष, कार्यकर्ते सहभागी झाले होते.यांच्यासह तालुक्यातील असंख्य महिला-पुरुष, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *