नांदेड ; प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यात कालरात्री पासून सर्वदूर पाऊसाची संततधार सुरू आहे. आज सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासात सर्वाधिक पाऊस माळाकोळी ५७, भोकर महसूल मंडळात ४६ मिलीमीटर नोंदवला गेला आहे. देगलूर ३२, अर्धापूर ३०, वानोळा २९, हिमायतनगर व मुखेड २७, नायगाव आणि कंधार २३, हदगाव २१, किनवट, सिंदखेड २०, सोनखेड १७, मुदखेड १५, बिलोली १३, वाई आणि कलंबर १२, कापशी, माहूर ११, ऊमरी १०, धर्माबाद ९, लोहा ८, शेवडी ७ असा पाउस झाला आहे.