कंधार ; ता.प्र.
कंधार ग्रामीण रुग्णालयात शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना अहार पुरविणा-या संस्थेवर कारवाई करा अशी मागणी २० जुलै रोजी माजी सैनिक संघटनेचे जिल्हा शल्यचिकित्सक निळकंठ भोसीकर यांना निवेदनाद्वारे केली आहे.
कंधार येथील ग्रामीण रुग्णालयात पाच दिवसाखाली महिलांचे कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आले परंतु या महिलांना शासनाच्या वतीने देण्यात येणारे जेवन व नाष्टा गेल्या ५ दिवसापासुन दिले जात नसल्याने सदरील रुग्ण घरुनच जेवन घेवुन येत आहेत.
रुग्णालयात रुग्णांना कुठल्याच प्रकारची जेवणाची व नाष्टाची सुविधा उपलब्ध नाही. या रुग्णालयात नांदेड येथील यशोदाई या संस्थेला जेवणाचे व नाष्टाचे टेन्डर दिलेले आहे. परंतु हि संस्था रुग्णालयातील रुग्णांना अद्यापही जेवन व नाष्टा देत नसल्याने या संस्थेवर कारवाई करून टैन्डर रद्य करण्यात यावे. व पर्यायी व्यवस्था म्हणून तात्काळ इतर कोणत्याही संस्थेला टेन्डर देऊन जेवण्याची व नाष्टाची व्यवस्था करावी अशी मागणी माजी सैनिक संघटना जिल्हा अध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी केली आहे.यावेळी निवेदन देताना माजी सैनिक संघटना कंधार तालुका उपाध्यक्ष शेख अजीज यांची उपस्थिती होती.