बिलोली: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक चांदु कुडके यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला ते गेल्या 15 वर्षापासून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून राहिले आहेत आणि ते माजी खासदार व भाजपा पक्षाचे प्रदेशउपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर याचे समर्थक आहेत .
यामुळे येणार्या कालावधीमध्ये बिलोली तालुक्यात भारतीय जनता पक्षाला गळती लागणार हे मात्र नक्की
विधान परिषदेचे आमदार अमर राजूरकर, युवक काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस जितेश अंतापूरकर याच्या प्रमुख उपस्थितीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक चांदु कुडके यांनी कॉँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील पाचपिंपळीकर बिलोलीचे माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष भिमराव जेठे, संदिप कटारे याची उपस्थिती होती.