लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कॉम्प्लेक्स वरील होर्डींग व बँनरचे अतिक्रमण हटवले;कंधार येथिल संयुक्त ग्रुपचा पुढाकार

कंधार ; प्रतिनिधी

लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे कॉम्प्लेक्स वर अनाधीकृतपणे एका खाजगी कंपणीचे होर्डींग व बँनर लावुन नाव झाकून अतिक्रमण केले होते. आज शुक्रवार दि.२३ जुलै रोजी सदरील अतिक्रम संयुक्त ग्रुपचा पुढाकाराने हटवण्यात आले.

लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे कॉम्प्लेक्स कंधार येथे एका खाजगी कंपनीचे होर्डिंग लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या नावावर लावण्यात आले होते. समाज बांधवांच्या वतीने होर्डिंग काढण्यासंदर्भात व्यापाऱ्यांना व नगरपरिषद यांना सूचना देऊनही होर्डिंग काढल्या नसल्यामुळे संयुक्त ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष साईनाथ मळगे यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून होर्डिंग काढा असा इशारा देण्यात आल्याने आज शुक्रवार दि.२३ जुलै रोजी काढण्यात आले.

यावेळी उपस्थित रेड पॅंथर चे संस्थापक अध्यक्ष, राजभाऊ मळगे, सामाजिक कार्यकर्ते गणेश ठेवरे, संयुक्त ग्रुप चे तालुकाध्यक्ष विजेंद्र कांबळे ,यांच्यासह समाज बांधवाची मोठ्या संख्येने समाज बांधवाची होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *