लोहा,( प्रतिनिधी)
लोहा ,कंधार मतदारसंघातील गेल्या चार दिवसापासून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन कापूस, सोयाबीन ,ज्वारी ,मूग ,उडीद सह इतर खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर लोहा, कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी मतदार संघातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतीचे तात्काळ पंचनामे करून मतदारसंघातील शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याचे निर्देश प्रशासनास दिले असून लोहा व कंधार तालुका हा अवर्षणग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो,
निसर्गाच्या वेळोवेळीच्या लहरीपणामुळे मतदारसंघातील शेतकरी राजा वर दरवर्षी निसर्गाच्या अवकृपेने एकावर एक संकटे ओढवत आहेत, लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांना गेल्यावर्षीचा अजूनही पिक विमा प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे मिळाला नसल्याची खंत आमदार शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त करत लोहा व कंधार मतदार संघातील शेतकरी, कष्टकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव कटिबद्ध असल्याचे स्पष्ट करत गेल्या चार ते पाच दिवसापासून लोहा व कंधार तालुक्यात मुसळधार पावसाने थैमान घालून मतदार संघातील हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे अतोनात नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार शामसुंदर शिंदे यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर ,उपविभागीयधिकारी पांडुरंग बोरगावकर, तहसीलदार विठ्ठल परळीकर ,कंधारचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे,लोहा व कंधार तालुक्यातील कृषी अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना मतदार संघातील अतिवृष्टीमुळे बाधित शेतीचे तात्काळ पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक नुकसानभरपाई देण्याचे निर्देश दिले असल्याचे लोहा व कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे यांनी बोलताना सांगितले.