कंधार ; प्रतिनिधी
गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुमाय पौर्णिमा असे नामकरण करणारे समाज क्रांतिवीरानी केले.त्यानंतर दुसरा दिवस म्हणजे आकाडी कर या सुदिनी आजुळ गऊळ नगरीतील तेलंग गढीवर मातोश्री मुक्ताईच्या उदरी नाजुकबी या दायीनीच्या मदतीने क्रांतिभुवन बहाद्दरपुरच्या दिवंगत शंकररावजी पाटील धोंडगे यांच्या घराण्याचा कुलदीप जन्मास येवून…..या मन्याड खोर्यातील खरा क्रांतिवीर बनला.त्यांच्या वाचन,चिंतन,मनन,संभाषण,भाषण,लेखन, विचारमंथन,मुक्ताईसुत, व्यायाम-प्राणायाम,सतत कार्यमग्न, रेकॉर्डब्रेक सत्याग्रह निर्माते,जयक्रांति स्फूर्तिदायक घोषणेचे निर्माते,गुराखीगड व जागतिक गुराखी साहित्य संमेलन आणि जागतिक गुराखी लोकनाट्य संमेलनाचे संयोजक,साप्ताहिक जयक्रांतिचे संपादक, पुरोगामी विचारधाराचे उत्कृष्ट लेखक,उत्कृष्ट संसदपटू, महाराष्ट्राचे शिक्षण महर्षी,अस्सल गावरान माराठी शब्दप्रभू,कायदे पंडिताला लाजवेल बुध्दीचातुर्य,र्हास्व-दीर्घ अचूक ज्ञान असलेले भाषाप्रभु, दीन-दुबळे,सुग्या-मुग्या, नाहीरे वाल्याचा आधारस्तंभ,भुत दया दाखवणारे,संस्थापक व संचालक, महाराष्ट्र विधानसभेतील कोहिनूर,आणीबाणीचे अग्रणी विरोधीवीर
असे कितीतरी विशेषणे लावले तरी कमीच आहेत
.सध्या वयाची शंभरी पार केलेले अचाट बुध्दीप्राविण्य व्यक्तीमत्व, ग्रामीण लेखिका,मुक्ताई मुद्रणालय क्रांतिभुवन बहाद्दरपुरा संचालिका,माजी खासदार व आमदार सौभाग्यवती,वाकळ(गोधडी) शिवण्यात सुगरण
असलेली पुर्णांगी यांनी शिवलेल्या वाकळीचे बॅकग्राऊंड घेवून तयार केलेल्या सदिच्छा बॅनर लिहून दिल्या!ही वाकळ मला सौ.चंद्रप्रभावतीबाई धोंडगे माय यांनी भेट देवून वात्सल्याची उब मिळाली.ही वाकळ बॅनरसाठी उपयोगी!
सौ .चंद्रप्रभावतीनाथ आदरणीय डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या शतकमहोत्सवी पार वाढदिवसा निमित्त्याने दीर्घायुरारोग्य मनस्वी सदिच्छा व मानाची कोटी-कोटी जयक्रांति!
सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार व एमेकर परिवार क्रांतिभुवन बहाद्दरपुरा,ता.कंधार