कंधार ; प्रतिनिधी
अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे थेट बांधावर जाऊन पाहणी करुन शेतकऱ्यांची वास्तविक परस्थिती मांडून अतिवृष्टी चे पंचनामे तात्काळ करण्यात यावेत अशी मागणी भाजपा महीला मोर्चा आघाडीच्या प्रदेशउपाध्यक्षा तथा जि.प.सदस्या सौ.प्रणिताताई देवरे चिखलीकर यांनी कंधार तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांना केली.
तसेच उस्माननगर आणि पेठवडज मंडळ यांचाही पीक नुकसान पंचनामे मध्ये समावेश करावा.सोबतच संजय गांधी निराधार योजनेच्या येणाऱ्या अडचणी संदर्भात चर्चा केली.
यावेळी भाजपा महिला जिल्हाध्यक्षा चित्ररेखाताई गोरे ,भाजपचे तालुका अध्यक्ष भगवान राठोड,अँड गंगाप्रसाद यन्नावार,किशनराव डफडे,शिक्षक परिषदेचे अध्यक्ष राजहंस शहापुरे,भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष निलेश गौर,असिफ शेख, मधुकर डांगे,साईनाथ कोळगिरे,अँड सागर डोंगरजकर,बालाजी तोटावाड,रजत शहापुरे,प्रकाश घोरबांड ,अविनाश गिते, संभाजी जाधव सह भारतीय जनता पक्षाचे मोठ्या संख्येने उपस्थिती होती.