कंधार ; प्रतिनिधी
मौ भोजूचीवाडी ग्रामपंचायत व मौ मानसिंगवाडी ग्रामपंचायत या गावचा पुल अतिवृष्टीमुळे वाहून गेला व मानसिंगवाडी गावाला पुल अभावी रहदारी करता येत नाही याचं गांभीर्य लक्षात घेऊन काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस संजय भोसीकर यांनी भेट देऊन दिलासादायक आश्वासनासह महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.ना अशोकराव चव्हाण साहेब यांच्या कडे मागणी सह पाठपुरावा करेन असे सांगितले….
सदरील भेटी दरम्यान दोन्हीही गावाचे सरपंच, उपसरपंच व सर्व सन्मानित सदस्यांसह गावकरी उपस्थित होते….
यामध्ये प्रामुख्याने संजय भोसीकर यांच्यासह सरपंच सतीश देवकत्ते, दैठणाचे चेअरमन पांडु पाटील दैठणेकर,किशन महाराज चोंडे, मधुकर पा लुंगारे, पांडुरंग पाटील आनकाडे,अर्जुन कागणे, माजी सरपंच अशोक जाधव, माजी सरपंच गंगाधर कागणे, सुधाकर केंद्रे,सुरेश राठोड, पंढरी श्रीराम,विठ्ठल गुट्टे, माधव गुट्टे, किशन श्रीरा,शांताबाई मुसळे, पारूबाई गोविंद कागणे,केंद्रे बाई यासह वाडी-तांड्याचा महिला व नागरिक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थित होती.
——————————————————-