ग्रामीण महाविद्यालय वसंतनगर येथे पदवी वितरण समारंभाचे आयोजन


मुखेड – विमुक्त जाती सेवा समिती वसंतनगर संचलित ग्रामीण (कला, वाणिज्य व विज्ञान ) महाविद्यालय वसंतनगर ता. मुखेड जि. नांदेड येथे दि.०२ ऑगस्ट २०२१ रोजी पदवी वितरण समारंभाचे आयोजन सकाळी ११.०० वाजता कै. गोविंदराव राठोड सभागृहात खालील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिदास राठोड राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार कर्मवीर किशनराव राठोड यांची उपस्थिती लाभणार आहे. यावेळी मागील वर्षीच्या कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना पदवीचे वितरण मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. कर्मवीर किशनरावजी राठोड साहेबांचे संपूर्ण आयुष्य शिक्षण व कृषी विकासाला वाहीले आहे.अस्या कर्मयोग्याच्या हस्ते शेतक-यांच्या आमच्या मुलांना पदवी प्राप्त होते आहे.
तेंव्हा सदरील कार्यक्रम हा कोरोनाचे सर्व नीयम पाळुन अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत संपन्न केला जाणार आहे. असी माहिती प्रस्तुत महाविद्यालयाचे परीक्षा विभाग प्रमुख प्रा. डॉ. परशुराम शिंदे तथा प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा. डॉ रामकृष्ण बदने यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *