कंधार ; प्रतिनिधी
कंधार तालुक्यातील रुई येथिल एका शेतकऱ्यांच्या शेतीच्या आखाड्यावरुन अज्ञात चोरट्याने अंदाजे 90 हजार किंमतीचे जनावरे चोरली आहेत.शेत मालकाने दिलेल्या फिर्यादीवरुन कंधार पोलीसात अज्ञाता विरुद्ध चोरीचा गुन्हा आज गुरुवार दि.२९ जुलै रोजी दाखल करण्यात आला आहे.
दिनांक २८ जुलै चे रात्री ०७.०० वा. चे दरम्यान, फिर्यादी गोविंद संभाजी पवार, वय ५२ वर्षे यांच्या शेतातील आखाडयावर मौ. रुई शिवार आखाडयावर बांधलेल्या दोन म्हशी व एक रेडा किंमती ९०,०००/- रु च्या कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेल्या.
गोविंद संभाजी पवार, यांच्या फिर्याद वरुन पोस्टे कंधार गुरनं २५१/२०२१ कलम ३७९, भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास पोउपनि श्री इंद्राळे हे करीत आहेत.
——————————————————-