कंधार ; प्रतिनिधी
कंधार तालुक्यातील ईमामवाडी येथिल आत्महत्या केलेल्या शेतकरी मयत संभाजी विठ्ठल जिंके यांच्या कुटूंबाची माजी जि.प.सदस्य दिलीप दादा धोंडगे,युवा नेते शिवराज धोंडगे यांनी बुधावार दि.२८जुलै रोजी भेट घेऊन सात्वंन केले.
संभाजी विठ्ठल जिंके यांनी बचत गटाचे कर्ज व बँकेचे कर्ज घेतले होते त्यात सतत नापिकी व पावसाने दुबार पेरणीचे संकट असे संकटात सापडलेल्या संभाजी विठ्ठल जिंके यांनी टोकाची भूमिका घेत दिनांक 27 जुलै रोजी सायंकाळी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष दिलीप दादा धोंडगे युवा नेते शिवराज धोंडगे, तालुका अध्यक्ष शिवदास पाटील धर्मापुरीकर, शहराध्यक्ष राजकुमार केकाटे, राष्ट्रवादी युवक ता अध्यक्ष माधव पाटील मोरे, गोपिनाथ भाऊ केंद्रे , ईमामवाडि चे सरपंच प्रकाश पाटील बुरुफुले,उप सरपंच माधव करेवाड, ज्ञानोब पाटील, गणेश पाटील , बाबुराव कोमले आदीसह गावकरी मंडळी उपस्थित होती.