कंधार ; प्रतिनिधी
कंधार तालुक्यातील पानशेवडी, गणातांडा येथे शेतकरी दिनेश पवार वीज पडून मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांस चार लाख रुपयांचा धानादेश लोहा व कंधार तालुक्याचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते देण्यात आला.
यावेळी अविनाश पानपट्टे पेशकार तहसील कंधार, मन्मथ थोटे आवल कारकून, सरपंच लक्ष्मण चव्हाण, कोंडीबा पाटील मोरे ,फुलवळ माजी सरपंच बालाजी देवकांबळे, नागेश गोधने,आदीसह पत्रकार व तांडा येथिल नागरीक उपस्थित होते.