माजी सैनिकांनी दिली ३६ हुतात्म्यांच्या कल्हाळी गावास भेट..! ; हुतात्म्यांच्या नावाने पुढाऱ्यांची नौटकी चालू देणार नाही – बालाजी चुकलवाड

कंधार प्रतिनीधी

कंधार तालुक्यातील कल्हाळी या गावात ३६ हुतात्मे झाले आहेत.आप्पासाहेब नाईक कोण आहे सांगा ? म्हणून रजाकारांनी तब्बल ३६ लोकांना गोळ्या घालुन ठार केले , व एका गढीत मध्ये टाकुन या गढीला आग लावुन या ३६ जणांना जाळुन टाकणारी थरारक घटना रजाकारांनी घडवली होती.

मराठवाड्यात  हुत्म्याच्या आठवणी म्हणून अनेक ठिकाणी स्मारक बांधण्यात आले आहे, परंतु कल्हाळी येथे कोणतेच स्मारक बांधण्यात आले नाही उलट ही गढी नामवेष झाली आहे.

केवळ १७ सप्टेबंर रोजी अनेक लोक कंधार तालुक्यातील कल्हाळी या गावात येऊन अभिवादन करुन जात असतात नतंर मात्र विसरुन जातत. हा आजपर्यतचा इतिहास आहे.

आज दि.४ अॉगस्ट रोजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने कल्हाळी येथे भेट देऊन स्वातंत्र सैनिकांची भेट घेतली व व्यथा जाणून घेतल्या.

शासनाने या रक्तरंजीत इतीहास असणाऱ्या गावात दि. १६ सप्टेबंर पर्यंत या ठिकाणी सुशोभिकरण करा अन्यथा १७ सप्टेबंर रोजी माजी सैनिक संघटना एका ही राजकीय नेत्यांना अभिवादन करण्यासाठी कल्हाळीत येऊ देणार नसल्याचा ईशारा माजी सैनिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष बालाजी चुकुलवाड यांनी दिला आहे.

     कंधार पासुन काही आंतरावरच कल्हाळी हे गाव आहे.या गावात ३६ हुतात्मे झाले आहेत.परंतु या गावातील तरुण पिढीला प्रेरणा देण्यासाठी कसल्याच प्रकारे स्मारक बांधले नाही.स्मारकाचा प्रस्थाव मंजुर झाला होता परंतु राजकीय पुढाऱ्यांच्या श्रेयवादातुन हे गाव स्मरकाच्या यादीतुन काढुन टाकले आहे.
१७ सप्टेबंरला या हुतात्यांना अभिवादन करण्यासाठी अनेक राजकीय पुढारी येतात,केवळ हार घालुन व भाषण करुन निघुन जातात.परंतु स्मारकासाठी कोन्हीच निधी देत नाही हे वास्तव आहे.

ज्या गढीमध्ये ३६ जणांना गोळ्या घालुन जाळण्यात आले ती गढी आज पुर्णपणे नामशेष झाली आहे.आज दि.४ रोजी माजी सैनिक संघटनेच्या पदाधीका-यांनी कल्हाळी या गावात जाऊन स्वतंत्र सैनिकांची चर्चा करुन या ठिकाणी स्मारक उभारावे यासाठी संपुर्ण गाव माजी सैनिक संघटनेच्या पाठीशी उभा राहणार असल्याची गाव्ही दिली.

यावेळी माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकुलवाड यांनी आक्रमक भुमीका घेतली आसुन हुतात्माचा पुळका दाखवणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांना कल्हाळी गावात स्मारक उभारण्यासाठी काय दिवे लावले असा सवाल केला असुन स्मारकासाठी निधी द्या अन्यथा १७ सप्टेबंरला  एकाही पुढाऱ्यांना अभिवादन करण्यासाठी येऊ देणार नाही असा इशारा दिला असुन कल्हाळी येथिल हुतात्म्यांचा थरकाप कापणार इतिहास पाहुन दानशुर लोकांनी समोर येऊन या घटनास्थळी सुशोभिकरण करण्यास हातभार लावावा असे आवाहन यावेळी केले आहे.

१६ सप्टेबंर पर्यंत कोणत्याच लोकप्रतिनीधीनी सस्मारकासाठी पुढाकार नाही घेतल्यास गावक-यांच्या मदतीने एकाही  लोकप्रतिनीधीना अभिवादन करण्यासाठी कल्हाळी येथे येऊ देणार नाही .आल्यास त्यांना हकलुन देण्यात येईल अशा ईशाराच बालाजी चुकुलवाड यांनी दिला आहे.

यावेळी अर्जुन कांबळे ,शेख अजिज,पोचिराम वाघमारे, बापुराव कल्यानकर, गोविंद सूर्यवंशी,सुर्यवंशी, राहुल कांबळे माजी सैनिक गावातील सरपंच ,स्वातंत्र्य सैनिक आदीसह गावकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *