कंधार ; प्रतिनिधी
कंधार लोहा विधानसभेतील जनता हि सदैव खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यावर प्रेम करणारी व सोबत राहणारी आहे म्हणून येत्या विधानसभा निवडणुकीत कर्यकर्त्यांनी तैयार राहावे असे आव्हान वाढदिवसाच्या निमीत्त आयोजित सत्कार कार्यक्रमा वेळी प्रवीण पाटील चिखलीकर यांनी कंधार येथे केले
दि२ऑगस्ट रोजी भाजपा जिल्हा सरचिटणीस,जिप सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त कंधार भाजपा च्या वतीने विविध कर्यक्रमांचे आयोजन करण्यात आले त्यात बडी दर्गा ,राम मंदिर,साधू महाराज संस्थान,बौद्ध विहार इथे पूजा करून त्यांच्या हस्ते पूजा करण्यात आली तर महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तर गांधी चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक, अभिवक्ता संघ,डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा,महाराणा प्रताप चौक,अण्णाभाऊ साठे स्मारक,बस्थानाक,येथे वाढदिवसानिमित्त कर्यकर्त्यांनी सत्कार करून वाढदिवसाच्या शुभेच्या दिल्या तर छत्रपती शिवाजी महाराज चौकात अड गंगाप्रसाद यन्नावार व निलेश गौर यांच्या वतीने गरजू मजुरांना छत्री वाटप करण्यात आली तर महाराणा प्रताप चौक येथे व्यंकट नागलवाड यांनी चिखलीकर यांचा शक्कर तुला केला,समारोप प्रसंगी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या संपर्क कार्यालयात अभिष्टचिंतन सोहळ्या वेळी बोलताना प्रवीण पाटील चिखलीकर म्हणाले की चिखलीकर कुटुंबीय सदैव जाणते सोबत राहते सत्ता असो अथवा नसो सर्व सामन्याच्या अडी अडचणी सोडवण्यास प्रधान्य दिले मागच्या काळात आपल्याच काहीं चुकांमुळे चुकीचे लोक निवडून आले असले तरी या मतदार संघाचे विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे या वेळी सत्कार प्रसंगी केले यावेळी लोहा कृ उ बा समितीचे सभापती बालाजी मारतळेकर,तालुकाध्यक्ष भगवान राठोड, शहराध्यक्ष अड गंगाप्रसाद यन्नावार यांनी मनोगत व्यक्त केले .
यावेळी सौ.प्रतिभाताई चिखलीकर, सौ.प्रणिताताई देवरे-चिखलीकर, सौ.वैशालिताई चिखलीकर, तालुकाध्यक्ष भगवान राठोड, उपनगराध्यक्ष जफरोद्दीन बाहोद्दीन, लोहा पं. स.सभापती आनंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती बालाजी पाटील मारतळेकर,तालुका सरचिटणीस किशनराव डफडे, शहराध्यक्ष अड गंगाप्रसाद यन्नावार, शहर सरचिटणीस मधुकर डांगे, भाजपा यु.मो.जिल्हाउपाध्यक्ष निलेश गौर, भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सौ.जयमंगल औरादकर, भाजयुमो तालुकाध्यक्ष साईनाथ कोळगिरे, नगरसेवक बालाजी पवार,नगरसेवक अनिता कदम, नगरसेवक सुनील कांबळे,नगरसेवक दिपक आवाळे, शिक्षक आघाडीचे तालुध्यक्ष राजहंस शहापुरे,दत्तात्रय चांदनफुलें,चेतन केंद्रे, साईनाथ कपाळे, विनोद तोरणे, बालाजी पवार, शैलेश बोरलेपवार, , बालाजी तोटवाड, व्यंकट मामडे, बाळू महाजन, बालाजी तोरणे,व्यंकट नागलवाड, सागर कदम, उमेश भुऱेवार, विक्रम मंगनाळे, शेख आसेफ, , अड सागर डोंगरजकर, महेश मोरे, रजत शहापुरे, सतिष पवळे,बालू पवार,सतीश कांबळे यांच्या सह भाजपाचे पदाधिकारी व तालुक्यातील सरपंच व करकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.