संयुक्त ग्रुप कंधार शहराध्यक्षपदी राहुल लोहकरे यांची निवड

कंधार ; प्रतिनिधी

लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह साठे नगर, कंधार येथे लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे व क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून

संयुक्त ग्रुप,कंधार शहराध्यक्षपदी राहुल लोहकरे यांची आज बुधवार दि.11 रोजी निवड संयुक्त ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष साईनाथ मळगे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली.

यावेळी उपस्थित विजेंद्र कांबळे (तालुका अध्यक्ष,कंधार) तिरुपती इंगळे (संयुक्त तक्रार निवरण अभियान अध्यक्ष मजरे धर्मापुरी) शिव इंगळे उपाध्यक्ष, महेश मोरे, व्यंकट कांबळे , माधव वाघमारे, ओम गायकवाड आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *