कंधार ; प्रतिनिधी
नवोदय विद्यालयाच्या वतीने वर्ग सहावी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांची नवोदय परीक्षा आज बुधवार दिनांक ११ ऑगस्ट रोजी घेण्यात आली.
कंधार तालुक्यातील सुमारे ६२० विद्यार्थ्यांनी चार परीक्षा केंद्रावरून कोरोनाचे नियम पाळून परीक्षा दिली असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी संजय यरमे यांनी दिली असून परीक्षा केंद्रावर तहसीलदार व्यंकटेश मुंडे व नायब तहसीलदार नयना कुलकर्णी यांनी भेट देऊन पाहणी केली .
नवोदय विद्यालयाच्या परीक्षा सुरळीत पार पाडाव्या म्हणून गटशिक्षणाधिकारी संजय यरमे यांनी नियोजन केले होते.या परीक्षेसाठी सुमारे ७४१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती पैकी ६२० वी हजर तर १२१ विद्यार्थी गैरहजर होते. शहरातील महात्मा फुले विद्यालय ,मनोविकास विद्यालय ,श्री शिवाजी हायस्कूल, प्रियदर्शनी कन्या शाळा या परीक्षा केंद्रावरून परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते.दरम्यान तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी परीक्षेच्या कालावधीमध्ये चारही परीक्षा केंद्रावर भेट देऊन पाहणी केली, आनंदी वातावरणात परीक्षा चालू असल्याने समाधान व्यक्त केले.
यावेळी शिक्षणविस्तार अधिकारी कैलास होनधरणे,सौ.अंजली कापसे,केंद्र प्रमुख एन.एम.वाघमारे , माधव कांबळे,मन्मथ थोटे,केंद्र संचालक तथा महात्मा फुले विद्यालय जे.जी.केंद्रे , दिगांबर वाघमारे आदीची उपस्थिती होती.
परीक्षेसाठी महात्मा फुले केंद्रावर डी.आर.कपाळे,कैलास गरुडकर,एन.पी.कपाळे,मंगनाळे डी.एन.,भुरे बी.टी.आंबुलगेकर पी.सी.,शेख सी.जी.,कांब्दे एम व्ही.यांनी पर्यवेक्षक म्हणून काम पाहीले.