कंधार ; प्रतिनिधी
राज्यस्तरीय आंदोलनचा एक भाग म्हणून आज क्रांती दिनी राज्यातील सर्व तालुक्यातून कोतवाल संवर्गाच्या मागण्या करिता मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन दि.९ रोजी सादर करण्यात येत आहे.
कंधार तालुका कोतवाल संघटनेतर्फे देखील हे निवेदन तहसीलदार कंधार यांना देण्यात आले.
तालुका अध्यक्ष राम बोदकूले , सचिव रामेश्वर तांबुळे , उपाध्यक्ष शेख जीलानी यांच्या स्वाक्षरी ने हे निवेदन देण्यात आले.