धानोरा कौठा येथिल पथदिव्यांचा प्रश्नासाठी विस्तार अधिकारी श्री.कोठेवाड यांना निवेदन

कंधार ; प्रतिनिधी

मौजे धानोरा कौठा येथिलदलीत वस्ती साठी आलेला पोल
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाच्या मोकळ्या जागेत बसवा यासाठी, विस्तार अधिकारी श्री.कोठेवाड यांना धानोरा येथिल समाज बांधवाच्या वतीने भेट घेऊन निवेदन दिले आहे.

पथदिव्यांचा पोल अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाच्या मोकळ्या जागेत लावा अशी समाजातील 70% जनतेचे मत आहे. पण हा पथदिव्यांचा पोल अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाच्या मोकळ्या जागेत लावण्यास नकार देत येथिल सरपंच प्रतिनिधी यांनी समाजाच्या मागण्या धुळीस फेकल्या या संदर्भात आज दि.१२ रोजी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री.कोठेवाड यांना निवेदन देण्यात आले .यावेळी समाजभुषण तथा मामा मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष मारोती मामा गायकवाड ,संदीप नवघरे ,भांजे बसवंते आदीसह समाजातील नागरीकांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *