कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांना पिक विमा परतावा द्या – मामा मित्रमंडळाची तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांना निवेदनाद्वारे मागणी. 

कंधार/प्रतिनिधी

     कंधार तालुक्यातील सन २०२०-२०२१ मधील खरीप पिकाचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले होते त्याचे पंचनामे प्रशासनाच्यावतीने करण्यात आले

शेतकऱ्यांनी पिकाचा वैयक्तिक विमा उतरुणही परतावा मिळाला नसल्याने शेतकरी संतप्त झाला असून तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा द्या अशी मागणी आज दि.१२ अॉगस्ट रोजी मामा मित्रमंडळाचे अध्यक्ष मामा गायकवाड कंधारकर यांनी तहसिलदार कंधार यांच्या कडे  लेखी निवेदनाद्वारे मागणी.

        कंधार तालुक्यातील औराळ येथील शेतकऱ्यांची २०२०-२०२१ खरीप पिकाचे अतिवृष्टीमुळे खूप मोठे नुकसान झाले आहे. यामुळे तालुक्यातील शेतकरी हा हवालदिल झाला आहे. पिक विमा कंपनीकडून मदत मिळेल या आशेवर बसला आहे. परंतु अद्यापही तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.


त्यामुळे तालुक्‍यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिक विमा द्या अशी मागणीसाठी मामा मित्रमंडळाचे अध्यक्ष मामा गायकवाड कंधारकर यांनी केले आहे.यावेळी औराळ येथील शेतकरी मनोहर पा पवळे,केशव पा पवळे,रमदास पवळे, हरिनाम पा पवळे,त्रिपती पा पवळे आदीची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *