कंधार ; प्रतिनिधी
बाभूळगाव तालुका कंधार येथिल बीएसएफ जवान संदिप केंद्रे यांचे शॉक लागून निधन झाले.त्या जवानावर उद्या गुरुवारी दि.१९ अॉगस्ट रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याची माहीती माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी दिली.
संदिप बालाजी केंद्रे ,बाभूळगाव ता.कंधार हे दि.१७ रोजी लोहा येथे असताना शॉक लागला मृत्यू झाला.त्याचे गेल्या सहा ते सात महिण्यापुर्वीच लग्न झाले होते.
तो सोळा आय पीबीपी बटालीयन लेक ,कश्मीर येथे सेवा बजावत होता नुकतेच तो
सुट्टी त आला होता.
५ वर्ष सैनिक म्हणून सेवा बजावणा-या संदीपचे नांदेड येथिल शासकीय रुग्णालय शव विच्छेदन करण्यात आले.त्यांच्यावर उद्या दि.१९ रोज गुरुवार राहते गाव बाभूळगाव तालुका कंधार येथे दुपारी शासकीय इतमामात होणार अशी माहीती माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी दिली.
अमर रहे 🙏🌺🙏