दै. पुढारी चे उपसंपादक श्री गोविंद सरदेशपांडे यांचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने वाढदिवसाच्या शुभेच्छा…
गोविंद सरदेशपांडे यांची पहीली ओळख किंवा भेट झाली होती मैत्री होती अशातलाही भाग नाही.तसा योगच जुळून आला दै.पुढारी मुळे.
२०१८ मध्ये मला कैलास बुक सेंटरचे मालक तथा पत्रकार सल्लागार दत्तूशेठ मामडे यांचा मला फोन आला की आपणास दैनिक पुढारी मध्ये कंधार तालुका प्रतिनिधी म्हणून काम करायचे आहे.माझे फोनवर बोलने झाले की मला माझ्या लेकरांचे शिक्षण आहे .त्यामुळे वेळ देता येणार नाही ,परंतु त्यांनी सांगितले की उद्या नांदेड ला जाऊन यावे पुढारी कार्यालयात … त्याप्रमाणे मी दुसऱ्या दिवशी नांदेड येथिल पुढारी कार्यालयात गेलो .तेव्हा पहीला नमस्कार आदरणीय गोविंद सरदेशपांडे यांच्याशी झाला सोबत जयपाल वाघमारे बातम्या करत होते.गोविंद सरांनी मला बसायला खुर्ची चहा वैगरे अशी सोय केली .
मी बसून गोवींद सरांच्या कार्याचे निरीक्षण करत होतो.अत्यंत चपळ माणूस ,बातम्या शेटअप,टाईप दुरुस्ती,आगदी संगणकावर बसून जणू काही संगणकच काम करत आहे.अपसूकच मी त्यांच्या काम करण्याच्या शैलीकडे आकर्षला गेलो.आणि बघता बघता माझे गोवींद सर मार्गदर्शक मित्र झाले.त्यानीं तेथे एक चार्ट लावला होता की बातम्या मध्ये कोणते शब्द चुकतात ,आकारऊकार,इदीसह चर्चा झाली मी त्यांचा कधी मित्र झालो समजलेच नाही.
दररोज फोन आज काय विशेष ,दररोज वेगवेगळ्या विषयावर मला लेखन करता आले.तळागळातील प्रश्न दैनिक पुढारी च्या माध्यमातून मांडता आले यांचे सर्व श्रेय गोविंदराव यांनाच जाते.
माझ्या पत्रकारीतेला आकार आणि माझ्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम गोविंदराव यांच्यामुळे निश्चितपणे झाले .पुन्हा कोरोना आला आणि काही कारणाने मला पुढारी सोडावा लागला .आता माझे युगसाक्षी संपादक म्हणून काम चालु आहे.
अशा या मार्गदर्शक मित्राला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा