बाभूळगाव येथिल बीएसएफ जवान संदीप केंद्रे यांच्या पार्थीवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

कंधार ; प्रतिनिधी

बाभूळगाव ता.कंधार येथिल बीएसएफ जवान संदिप बालाजी केंद्रे यांच्या पार्थीवावर आज गुरुवार दि.१९ अॉगस्ट रोजी प्रशासनाच्या वतीने शासकीय इतमामात अंत्यसस्कार करण्यात आले.

जवान संदिप बालाजी केंद्रे यांचे दि.१७ रोजी निधन झाले होते.आज दि.१९ रोजी कंधार तालुक्यातील मूळ गावी बाभूळगाव येथे अंत्यविधी करण्यात आला.

  यावेळी इंडो टिबेटियन बाॅर्डर पोलीस व माळाकोळी पोलीस च्या वतीने मानवंदना देण्यात आली.

लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे, कंधार तहसीलदार व्यंकटेश मुंडे,स.पोलीस निरीक्षक डोके,सभापती प्र.घोरबांड,अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शेख शेरू भाई,पोलीस पाटील संग्राम भिगरे, राम गोरे,सरपंच प्र.बाळासाहेब गर्जे,अवधूत पेठकर,महेश पिनाटे,माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड,माजी जि.प.सदस्य धोंडगे ,सतिश देवकत्ते,पं.स.सदस्य उत्तम चव्हाण,राजहंश शहापुरे आदीसह पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *