कंधार ; प्रतिनिधी
खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे चिरंजीव लोहा कंधार विधानसभेचे युवा नेते भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा परिषद सदस्य प्रविण पाटील चिखलीकर यांनी कंधार शहरात अयचर टेंम्पोचे ब्रेक निकामी झाल्याने मोठा भीषण अपघात झाला होता त्यावेळी कंधार तालुक्यातील बाभुळगाव येथील रहिवासी असलेले कै.गोविंदराव भंगारे व कै मथुराबाई भंगारे या पती पत्नी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आज दि.१९ रोजी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबा ची भेट घेऊन सांत्वन करून आर्थिक मदत केली.
तसेच काही गरज पडल्यास आम्ही आपणा सोबत आहोत. असे आश्वासन प्रविण पाटील चिखलीकर यांनी दिले.
यावेळी नांदेड महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ चित्ररेखा गोरे,डुमने वंदना,कंधार नगर परिषद उपाध्यक्ष जफर बाहोद्दिन,भाजपा तालुकाध्यक्ष भगवान राठोड, शहराध्यक्ष गंगाप्रसाद यन्नावार, युवाआघाडी चे जिल्हा उपाध्यक्ष निलेश गौर,तालुका सरचिटणीस कीशन डफडे,शहर सर चिटणीस मधुकर डांगे,माजी नगराध्यक्ष प्रतिनिधी चेतन केंद्रे,शिक्षक आघाडी तालुकाध्यक्ष राजहंस शहापुरे, युवाआघाडीचे माजी तालुकाध्यक्ष अविनाश गिते,व्यंकट नागलवाड,नगरसेवक प्रतिनिधी आसेफ शेख,ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष गंगाधर कांबळे,माजी नगरसेवक बालाजी पवार,राजू पाटील लाडेकर घोरबांड , रवींद्र थोरात आदीची यावेळी उपस्थिती होती.