मानवजातीचे पृथ्वीवर अवतार झाल्यापासून तो सतत सुखाच्या शोधात फिरत राहिला व फिरत असतो . त्यासाठी त्याची सतत धडपड चालू असते . तो सुखाचा शोध घेत राहिला व सुखाचा शोध तो शोधतो आहे . सुख कुठे मिळेल , कसे मिळेल याचा सतत विचार तो करत राहिला व सध्याला विचार चालू आहेत .या सुखासाठी त्याने कधी गित गायीले तर कधी गीत लिहीले .कधी नृत्य केले तर कधी नृत्याचे प्रकार शोधून काढले .कधी संगित एकले कधी तर कधी संगिताची निर्मीती केली . असचं हळूहळू मानवजात विकसित होत गेली व हळूहळू करमणूकीचे विविध प्रकार व साहित्य ही वाढत राहीले . पुढे कालांतराने हळूहळू मानव वरील प्रकार शिवाय स्वतःच्या करमणुकीसाठी प्राण्याच्या झुंजी लावणे . पक्ष्याच्या झुंजी लावणे हे प्रकार सुरु केले . यात त्याला आनंद मिळायचा .
यानंतर लोकसंख्या वाढत गेली . वेगवेगळे समाज गट तयार झाले ते समुहा समुहाने फिरू लागले व राहू लागले. या वेगवेगळ्या समुहात मग वर्चस्वासाठी चढाई व लढाई सुरु झाली . सर्वच प्राणी जातीत अथवा पक्ष्यांच्या राज्यातही ते जन्मल्यापासून मरेपर्यंत वर्चस्व गाजवण्याची वृती जोपासत आसतात हे आपण पहातोच . कोंबडीचे पिल्ले , कुत्र्याची पिल्ले वा कोणत्याही पक्ष्याची वा प्राण्याची पिल्ले लहानपणापासून भविष्यात वरचढ ठरण्यासाठी , दादा बणण्यासाठी धडपड करत असतात . एकाच घरातील भांवडे ही एकमेकांवर कुरघोडी करतच असतात . थोडक्यात दुसऱ्यावर वर्चस्व गाजविणे हा सर्व प्राण्यांचा पक्ष्यांचा गुणधर्मच आहे .
प्राण्यात मानव हा सर्वात बुद्धीमान प्राणी त्याने स्वतःच्या करमुणीकीसाठी व वर्चस्व स्थापन करण्यासाठी व्दंद युद्ध , कुस्ती , धावने ,समुहा समुहात युद्ध करणे हे प्रकार सुरु केले . या वर्चस्व गाजविण्याच्या मानव प्रवृतीतूनच पुढे ऑलम्पिक खेळाची निर्मिती झाली असावी . या ऑलम्पिक खेळात हिंसाचार , युद्ध या गोष्टीना थारा देण्यात आलेले नाही . मानवी विकासांबरोबर खेळातही अधुनिकता आली . खेळात देशाभिमान , प्रेम ,सहकार्य , जवळीकता , सहानुभूती व मानवता या गुणांचा विकास झालेला दिसून येते .
पहिले अधुनिक ऑलम्पिक खेळ इस १८९६ साली अथेन्स या शहरात झाले . हे शहर ग्रीस या देशात आहे .त्यानंतर इस १९०० च्या ऑलम्पिक खेळात भारताचा सहभाग होता . पण त्यावेळी आपण गुलाम होतो . या ऑलाम्पिक मध्ये भारताकडून खेळताना नॉर्मन प्रीचार्ड याने दोनशे मीटर धावण्याच्या (अडथळा) शर्यतीत रजत पदक जिंकले होते . संकेंदाच्या काही अंशात त्याचे सोनरी पदक हुकले होते . हा मनुष्य इंग्रज होता . म्हणून आपण हे मिळवलेल पदक आपलं मानत नाही .
भारतीय हॉकी संघाने ऑलॅम्पीक मध्ये आता पर्यंत सर्वात जास्त सुवर्ण पदक जिंकलेले आहेत . एकूण आठ सुवर्ण पदक हॉकी या खेळात जिंकलेले आहेत म्हणूनच हॉकीला भारताचा राष्ट्रीय खेळ म्हणून मान्यता मिळलेली असावी . भारताने १९२८ साली झालेल्या ऑलम्पिक मध्ये पहिले सुवर्ण पदक मिळवले . त्या नंतर १९३२ , १९३६ ,१९४८ , १९५२ , १९५६ , १९६४ असे सलग सुवर्ण पदक जिंकले . तर भारताने शेवटचे सुवर्ण पदक रशियात मास्को येथे झालेल्या १९८० साली जिंकले . भारताने १९६० साली रजत पदक तर १९६८ व १९७१ साच्या ऑलाम्पिक मध्ये भारताला ब्राँझ पदकावर समाधान मानावे लागले .
स्वतंत्र्य भारताकडून पहिले वैयक्तिक पदक जिंकण्याचा मान जातो के .डी . जाधव यांना त्यांनी १९५२ सालच्या ऑलॉम्पिक मध्ये कुस्तीत बाँझ हे पदक मिळवले होते . त्यानंतर लियांडर पेस यानी टेनिस या खेळात १९९६ च्या ऑलम्पिक मध्ये ब्राँझ पदक भारताला मिळवून दिले होते . तर राजवर्धन राठोड यांनी डब्बल ट्रॅप (शुटींग ) मध्ये २००४ मध्ये रजत पदक जिंकले होते .हॉकी सोडलं तर भारत ऑलॅम्पिक मध्ये सोनेरी कामगीरी करताना दिसत नाही . भारताने आतापर्यंत ऑलम्पिक इतिहासात दहा वेळेस सोनेरी कामगिरी केलेली आहे . त्यात हॉकी या सांघिक खेळात आठ वेळा सुवर्ण मिळालेले आहे त्यानंतर अभिनव भिंद्रा याने दहा मीटर ऐअर रायफल नेमबाजीत व निरज चोप्रा याने भालफेकीत सुवर्णमय कामगिरी केलेली आहे . आतापर्यंत झालेल्या ऑलॉम्पिक मध्ये भारताने एकून ३५ पदकं मिळविलेली आहेत . कर्नम मल्लेश्वरी व मिराबाई चानू यांनी भारताला भारतोलन मध्ये अनुक्रमे ब्राँझ व रजत पदक मिळवून देशाची मान उचावलेली आहे . सिंधू हिने दोन वेळा बॅटमिंटन मध्ये पदक मिळवलेले आहेत त्यात एकदा रजत व एकदा ब्राँझ पदक मिळवण्याचा पराक्रम केलेला आहे तर कुस्तीपट्टू सुशिलकुमार यांनेही दोन ऑलम्पिक मध्ये ब्राँझ पदकांची कमई केलेली आहे .
सर्व भारतीयांचं लक्ष लागलेल होतं ते टोकीयो ऑलम्पिक २०२० कडे . यात भारताच्या एकूण १२७ खेळाडूंनी भाग घेतला होता . या सर्वाच्या कामगिरीकडे भारतीयाचे डोळे लागले होते . मिराबाई चानूने छान सुरवात करून दिली . तिने भारातोलन मध्ये पहिले रजत पदक जिंकले . भारतात आनंदाची लहर पसरली . सर्व भारतीयाच्या अशापल्लवीत झाल्या . रविकुमार यांने रजत पदक कमविले . तर लव्हलीना , पीव्ही सिंधू , बंजरंग पुनिया व हॉकी संघानी ब्राँझ पदकांची कमाई केली . हे सर्व भारतीयासाठी अभिमानास्पद होते व आहे . २३ जुलै २०२१ पासून सुरु झालेल्या टोकीयो आलॉमिक मध्ये भारताला सहा पदक मिळाले . त्यात दोन रजत होते तर चार ब्राँझ होते . पण सोनेरी कामगिरी कोणीच करत नव्हते . सर्व भारतीयांचं जीव सोनेरी पदकासाठी असुसलेले होते,हपापलेले होते . येवढ्या मोठ्या देशाला एकही सूवर्ण नाही याचं वाईट ही वाटत होतं हे प्रत्येकांचा मनाला खटकत होतं .
शेवटी आठ ऑगष्ट हा दिवस उजाडला . एक तेविस वर्षाचा सळसळीत रक्ताचा तरुण जोषपूर्ण भालाफेक करत होता . त्याच्यावर कुठलाच दबाब दिसत नव्हता . त्याच्या नसानसात भारतीय रक्त सळसळत होतं . त्याचे दहा आकरा प्रतिस्पर्धी प्रयत्नाची पाराकष्टा करत होते . पण निरजने ८७ .५८ मीटर इतके लांब भाला फेक केली . प्रतिस्पर्धी त्याच्या जवळही पोहचू शकले नाही . त्याने भारतीयांसाठी सोनेरी किरणं सोनेरी आशा व सोनेरी पदक घेवून आला . कोणाकडे छप्पन इंची छाती असो वा नसो पण सर्व भारतीयां ची छाती त्याचा त्या सोनेरी कामगिरीने फुगली होती . या दिवशी भारतभर सोन्याचीच किरण घराघरात पडलेली होती . ब्रिंदाच्या कामगिरी नंतर सोनेरी कामगिरी करणारा हा दुसराच भारतीय . टोकियो ऑलम्पिक सुरु झाल्यापासून भारत देशाची राष्ट्रगाणाची धुन ऐकण्यासाठी सर्वांचे कान अतुर झालेले होते . ती इच्छा निरजने पूर्ण केली . या ऑलम्पिक मध्ये अमेरिका एकूण ११३ पदक जिंकून पहिला राहिला तर आपला शेजारी चीन एकूण ८८ पदक जिंकून दुसरा तर जपान एकूण ५८ पदकं जिंकूण तिसऱ्या स्थानी राहीले . निरजने भारताला ६७ / ६८ या क्रमांकावरून चक्क ४८ या क्रमांकावर आणुन ठेवले . याबदल सर्व देशवासीयांकडून देशाचे महामहीम राष्ट्रपती ,पतंप्रधान व सर्व मंत्रीगण यांनी सर्व विजेत्यांचे व ऑलमिक पट्टूचे तोंडभरून कौतूक केले .अभिनंदन निरज अभिनंद !!! सर्व भारतीय खेळाडूंचे अभिनंदन ! तुमचं आम्हाला अभिमान आहे .
राष्ट्र आणि राज्य सरकारणे शिक्षण व खेळ यासाठी योग्य नियोजन करून ते तळागळापर्यत राबविले तर भारत शिक्षणात व खेळात एक महाशक्ती म्हणून निश्चितच उदयाला आल्याशिवाय राहणार नाही . शाळेत खेळाच्या शिक्षकाचे पद भरलेले नसतात गणित विज्ञानचे गुरुजी खेळाचे तास घेताना दिसतात .सर्व लहान मोठे पदाधिकारी सरपंच ,आमदार ,खासदार ,मंत्री मुख्यमंत्री ,पंतप्रधान व राष्ट्रपती यांनी शिक्षण व खेळाकडे गांभिर्याने लक्ष दिल्यास भारत सर्वच बाबतीत जगात महाशक्ती बनेल यात भारतीयांना तिळमात्र शंका नाही .
राठोड मोतीराम रुपसिंग
” गोमती सावली “, काळेश्वरनगर, विष्णुपूरी , नांदेड -६
९९२२६५२४०७ .