महाराष्ट्र अंधश्रद्ध निर्मुलन समिती नांदेड जिल्हा तर्फे डॉ.दाभोळकरांना अभिवादन

नांदेड ; प्रतिनिधी

डॉ.नरेंद्र दाभोळकर स्थापित महाराष्ट्र अंधश्रद्ध निर्मुलन समिती नांदेड जिल्हा तर्फे
आज दि.20 ऑगस्ट रोजी शहीद डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या 8 व्या स्मृतिदिनानिमित्त नांदेड येथील गांधीजींच्या पुतळ्या समोर अभिवादन सभा घेऊन डॉक्टरांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपस्थितांनी दाभोळकरांचा विचार अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृतीशील होण्याचा व संघटन वाढविण्याचा निर्धार व्यक्त केला. या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष डॉ. किरण चीद्रावर, कार्याध्यक्ष श्रीनिवास, अमृत कऱ्हाळे(कार्याध्यक्ष, अंनिस शाखा पुर्णा), गणेश पाटील, कॉ. सदाशिव भुयारे ( जनरल सेक्रेटरी,कम्युनिस्ट पार्टी- युनायटेड), कॉ.प्रा.राज सुर्यवंशी (जिल्हाध्यक्ष, शिक्षक-प्राध्यापक संघटना), प्रा. अविनाश कळकेकर, प्रा. मुरलीधर हंबर्डे, गजानन जाधव, ॲड. राणीपद्मावती बंडेवार, अभिलाष इंगोले, शंकर जाधव, बाळासाहेब भुरे, तुळशीदास इत्यादी अनिंसचे पदाधिकारी आणि इतर समविचारी संघटनांचे साथी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *