नांदेड ; प्रतिनिधी
ङृप्रांत 3234 एच 2 मध्ये 2020 -21 या वर्षात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल लायन्स क्लब नांदेड सेंट्रल ला तब्बल 11 पुरस्कार मिळाले असून त्यामध्ये लायन्सच्या डब्याला विविध गटातील 5 पुरस्कार मिळाले आहे आशी ! अग्रवाल यांनी दिली.
लायन्स प्रांत 3234 एच 2 मध्ये एकूण 84 क्लब आहेत. औरंगाबाद येथील ताज विवांता या पंचतारांकित हॉटेलमध्ये बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला.
यावेळी ज्येष्ठ संपादक राजेंद्र दर्डा, लायन्स आंतरराष्ट्रीय माजी डायरेक्टर डॉ.नवल मालू, गेल्या वर्षीचे प्रांतपाल विवेक अभ्यंकर, प्रांतपाल दिलीप मोदी, प्रथम उपप्रांतपाल पुरुषोत्तम जयपुरिया, प्रांत सचिव राहुल औसेकर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. सर्वात मानाचा समजला जाणारा बेस्ट प्रेसिडेंट अवार्ड संजय अग्रवाल यांना मिळाला.
झोनल सेक्रेटरी चा पुरस्कार डॉ. विजय भारतीया यांना मिळाला. संपूर्ण महाराष्ट्रभर ख्याती मिळालेल्या लायन्सच्या डब्याला विविध गटात मिळालेले 5 पुरस्कार धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर, अरुणकुमार काबरा, सुरेश शर्मा यांनी स्वीकारले.
याशिवाय जीएमटी अचीवमेंट अवार्ड व जीएलटी अचीवमेंट अवार्ड, लहान मुलांचा कर्करोग जनजागृती पुरस्कार नांदेड सेंट्रलला मिळाले आहेत.
गेल्यावर्षी लायन्स क्लब नांदेड सेंट्रल च्या ॲड. उमेश मेगदे, सुनील साबू, लालचंद आसवानी नागेश शेट्टी, अमोल चक्रवार, राजेशसिंह ठाकूर, धनराजसिंह ठाकुर,मनमत स्वामी यांच्यासह सर्व सदस्यांनी यांनी केलेल्या योगदानामुळे हे पुरस्कार मिळाले असल्याचे संजय अग्रवाल यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्रात सर्वात जास्त पुरस्कार मिळाल्यामुळे नांदेड सेंट्रलचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.