नांदेड दि. 21 – माओवाद्यांनी शुक्रवार दि. 20 रोजी छत्तीसगडमधील नारायणपूर येथे केलेल्या भ्याडहल्ल्यात नांदेड जिल्ह्यातील बामणीचे सुपूत्र असिस्टंट कमांडंट सुधाकर राजेंद्र शिंदे शहीद झाले. यामुळे त्यांचे जन्मगाव बामणी, मुखेड तालुका व नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
या शहिद जवानाचा अंत्यविधी उद्या दि. 22 रोजी सकाळी 10 वाजता शासकीय इतमामात बामणी येथे करण्यात येणार आहे. या अंत्यविधीसाठी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण हे उपस्थित राहून राज्य शासनाच्यावतीने आदरांजली वाहणार आहेत.