कंधार ; प्रतिनिधी
शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे खंबीर मुख्यमंत्री उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबतीत बेताल वक्तव्य करून सतत प्रकाश झोकात येणारे केन्द्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबतीतही जिभ घसरली त्यांचा निषेध कंधार तालुका तथा विधानसभा तर्फे आज मंगळवार दि.२४ रोजी करण्यात आला.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत त्यांना जोड्याने मारत जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी आदोंलन कर्त्यानी नार्या चकस कायह.. ह्या कोबंडीचोराचं कस काय… हमसे जो टकरायेंगा अश्या निषेधार्थ घोषणाबाजी केली.
तर जिन्दाबाद ssजिंदाबाद शिवसेना जिंदाबाद… मुख्यमंत्री उध्दवजी यांच्या नावाचा जयजयकार केला.
यावेळी लोहा-कंधार विधानसभा संघटक गणेश कुंटेवार, तालुकाप्रमुख मुसळे, शहरप्रमुख बाळू पाटील लुंगारे,माजी सभापती प्रतिनिधी पंडीत देवकांबळे, पंचायत समिती सदस्य उतम चव्हाण,उपसंरपच मारोती पंढरे,प्रभाकर केंद्रे, संरपंच राजू केंद्रे,चक्रधर घुगे, संरपंच बालाजी गिते, अजिंक्य यन्नावार यासह अनेक युवासैनिक, शिवसैनिक उपस्थित होते.