कंधार : प्रतिनिधी
येथे ऑल इंडिया तंजीमे इन्साफ संघटनेची तालुका कार्यकारिणी दि.२४ रोजी कंधार येथिल शासकीय विश्रामगृह येथे जाहीर करण्यात आली.कार्यकारिणीत तालुका अध्यक्षपदी शेख शादुल, तर उपाध्यक्ष शेख हाजी शादुल, सचिवपदी शेख सादिक यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संघटनेचे जिल्हाध्यक्ष अब्दुल बशीर माजीद, प्रा. जुबेर खान, मोहीन कुरेशी , मुखेड उपाध्यक्ष सादिक तांबोळी, लोहा प्रभारी तालुका अध्यक्ष निहाल मंसूरी, लोहा तालुका अध्यक्ष अन्सार खां पठाण ,लोहा कोषाध्यक्ष चांद पटेल, लोहा सल्लागार व सचिव हाजी ताजोदीन कुरेशी यांची उपस्थिती होती.
विश्रामगृह येथे कार्यक्रम पार पडला त्यात अल्पसंख्यांक समुदायातील येणाऱ्या अडचणी संबंधित होणाऱ्या अन्याय विरुद्ध योग्यप्रकारे संघटना आवाज उठवेल व उपेक्षित वंचित लोकांना न्याय देण्यात येईल, यावर चर्चा झाली.
कार्यकारिणीत तालुका अध्यक्षपदी शेख शादुल, तर उपाध्यक्ष शेख हाजी शादुल, सचिवपदी शेख सादिक, सहसचिव आसीम हाफिज ,सल्लागार म्हणून शेख आरेश, शहराध्यक्षपदी सय्यद सादात, शहर उपाध्यक्ष हासीब परदेशी, सचिव शेख सद्दाम ,सहसचिव लखन काळेकर, कोषाध्यक्ष शेख जुबेर ,सल्लागार, अँड शहबाज खान या प्रमाणे कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
यावेळी काँग्रेस पक्षाचे युवानेते अहमद चौधरी लोहा कंधार मतदारसंघाचे विधानसभा अध्यक्ष शेख हाब्बू कंधार एम.आय.एम पक्षाचे तालुकाध्यक्ष मोहम्मद हमिद्दोदीन, शेकाप पक्षाचे तालुकाध्यक्ष शेख सद्दाम, शेख मोबिन, शेख नयर, शेख मोसीन,विशाल गायकवाड, अर्शद कुरेशी यांच्या उपस्थिती मध्ये ही निवड करण्यात आली.