ओढ्याला आलेल्या पुरात वाहून जाऊन दोन महिलांचा मृत्यू ;किनवट तालुक्यातील शिवनी येथील घटना.

किनवट ; प्रतिनिधी

ओढ्याला आलेल्या पुरात वाहून जाऊन दोन महिलांचा मृत्यू तर दोन महिला बालबाल बचावल्याची घटना नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील शिवणी येथे घडली आहे तहसिलदार डॉक्टर मृणाल जाधव यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहीती यावेळी दिली.

राधाबाई गणपत कोरेवाड, सविता गंगाराम भुसेवाड, प्रेमलाबाई तमलवाड, महअबी रजाक अगुवाड या चारही महिला शेतातील निंदणी कामांकरिता गेल्या होत्या… दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ढगफुटी सदृष्य पाऊस झाल्याने त्या घराकडे परत नाला ओलांडून येत असताना अचानक नाल्याला आलेल्या पुराच्या प्रवाहात प्रेमला बाई तमलवाड, महअबी रजाक, या दोन महिला वाहुन गेलेल्या तर राधाबाई कोरेवाड,सवीता भुसेवाड,या दोन महिला बालबाल बचावल्या.

वाहून गेलेल्या महिलांचे मृतदेह शोधकामी भाजपाचे तालुका सरचिटणीस बालाजी अल्लेवार शिवसेनेचे युवा नेते गजानन बच्चेवार, उपसरपंच संतोष जाधव, ज्ञानेश्वर राऊलवाड यांच्यासह गावकऱ्यांनी शोध घेतला असता दोन किलोमीटर अंतरावर मृत देह सापडले.

या घाटनेची माहिती किनवट तहसीलला कळताच किनवट तहसीलच्या तहसीलदार डॉक्टर मृणाल जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पुरात वाहून जाऊन मृत पावलेल्या पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला व शासनाकडून काय मदत करता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू अशी यावेळी ग्वाही दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *