कंधार ; प्रतिनिधी
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाराष्ट्रातील आघाडी सरकार सत्तेचा गैरवापर करून अटक केल्यामुळे भारतीय जनता पार्टी कंधार च्या वतीने आज दि.२५ रोजी तहसीलदार कंधार यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्रातील आघाडी सरकार आपल्या सत्तेचा गैरवापर करत बेकायदेशीर हुकूमशाही पद्धतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश दिले महाराष्ट्रातील आघाडी सरकार सुडबुद्धीने भाजपा नेत्यांच्या विरोधात कार्यवाही करीत आहे व गुडगिरीला खतपाणी घालत आहे.
त्यामुळे भाजपा कार्यालयावर हल्ले केले जात आहेत असेच प्रकार पुन्हा जर महाराष्ट्रात झाले तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे तहसीलदार याना देण्यात आला.
यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष भगवान राठोड,शहराध्यक्ष अड गंगाप्रसाद यन्नावार,मधुकर डांगे,चेतन केंद्रे, बालाजी पवार,श्रीराम जाधव,बालाजी तोरणे,सागर कदम,ज्ञानेश्वर मुंडे, शिवाजी पवार,दिपक राठोड, बालाजी जाधव,कैलास मुंडे सह भाजपा पदाधिकारी कार्यकरते उपस्थित होते.