लोहा दिनांक 25 ऑगस्ट (प्रतिनिधी)
सध्याच्या आधुनिक युगामध्ये शालेय विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीने शिक्षण देणे अत्यंत गरजेचे झाले आहे असे प्रतिपादन माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांनी ईतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने माध्यमिक आश्रम शाळा नेहरूनगर लिंबोटी तालुका लोहा येथील विद्यार्थ्यांना दिलेल्या टैब (TAB) चे वाटप करताना केले.
कार्यक्रमच्या प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाला जिल्हा काँग्रेस चे सरचिटणीस संजय भोसीकर सेवानिवृत्त मुख्याध्यापक हावगीराव आंधळे, कृष्णाभाऊ भोसीकर मुख्याध्यापक अशोक सापनर,तानाजी मारकवाड,पालक, शाळेतील शिक्षक शिक्षिका व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
ईतर मगास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी यावर्षी टैब देण्यात आले असून आज माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी शाळेच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी बोलताना भोसीकर म्हणाले की आजच्या आधुनिक काळामध्ये विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शैक्षणिक साहित्य टैब, लॅपटॉप आदी मार्फत शिक्षण दिले पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये यातून मदत होईल सध्याचा कोरोना चा काळ असून या काळामध्ये शाळा बंद ऑनलाइन शिक्षण चालू आहे यामुळे अशा या अत्याधुनिक साहित्याची आज विद्यार्थ्यांना गरज आहे सर्व शिक्षकांना माझे सांगणे आहे की आज शाळा जरी बंद असल्या तरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गैरसोय होणार नाही या कड़े व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबीकडे लक्ष द्यावे विद्यार्थ्यांना घरी जाऊन शिक्षण द्यावे ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे कोरोना कालामधे सर्व शासनाच्या नियमांचे पालन करावे तसेच पालकानी आपल्या मुलांच्या अभ्यासा कड़े नियमित लक्ष ठेवावे असे ईश्वरराव भोसीकर या प्रसंगी म्हणाले.
कार्यकमाचे सूत्रसंचलान मुस्तापूरे सर यांनी केले तर आभार बेदरे सर यांनी मानले.